श्रीदत्त कृपेने-सद्गुरू कृपेने गेली १६/१७ वर्षे हिमालयाची यात्रा प्रतिवर्षं घडत आहे...श्री नारायणाची तपोभूमी असलेल्या बदरीकाश्रमात जाऊन किमान एक सप्ताह मुक्काम करून सामूहिक विष्णू सहस्र नाम पठण, श्रीदत्त बावन्नी अनुष्ठान, नाम संकीर्तन इत्यादी उपक्रम केले जातात.
श्रीदत्त कृपेने व श्री सद्गुरू कृपेने गेली १६/१७ वर्षे गिरनार वारी अखंड पणे चालू आहे...गेल्या दोन वर्षां पासून गिरनार पर्वताची ३९ किमी. अंतराची जंगल मार्गातील परिक्रमा व जाता/येता दोनदा गिरनार वारी घडत आहे. प्रतिवर्षी कार्तिक शु.एकादशी ते कार्तिक शु.पौर्णिमा असे पाचच दिवस परिक्रमेचा कालावधी असतो. ह्या दरम्यान ही यात्रा आयोजित केली जाते.
श्रीदत्त संप्रदायातील व अन्य अध्यात्मिक तीर्थ स्थळांना यथामती-यथाशक्ती योगदान केले गेले तसेच काही ठिकाणी चालू असलेल्या सुयोग्य उपक्रमासाठी मदत सेवाकार्य करण्याचा मानस आहे. उदाहरणार्थ :-
बारा महिने चोवीस तांस कर्तव्य कर्म करून "सद् रक्षणाय-खल निग्रहणाय" हे सूत्र घेऊन कार्य करणाऱ्या पोलीस दलास दिवाळी निमित्त फराळ भेट व शुभेच्छां दिली जाते. सध्या हे कार्य शिरोळ पोलीस स्टेशन व कुरुंदवाड पोलीस स्टेशन एव्हढेच मर्यादित आहे. दत्तकृपेने हे कार्य अधिकाधिक लोकसहभागातून व्यापक स्वरूपाचे करण्याचा मानस आहे.
वर्तमान स्थितीत ह्या धकाधकीच्या काळांत "उपासना" हाच आधार आहे हे जाणून सोप्यात सोपे व अत्यंत प्रभावी व प्रासादिक स्तोत्र पठण म्हणजे "श्रीदत्त बावन्नी" व "विष्णू सहस्र नांम" पठण होय. श्रीदत्त बावन्नी व विष्णू सहस्र नाम सर्वाना म्हणता यावे, त्याचा लाभ सर्वाना घडावा ह्या उद्देशाने "vivek buwa Gokhale" हां youtube चॅनेल सुरु केला आहे. दत्त बावन्नीचा अर्थ व त्याची पद्धत जाणून घेऊन म्हटल्यास पठण कर्त्यास त्याचा उत्तमोत्तम लाभ घडेल ह्या हेतूने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दत्त बावन्नी स्तोत्राची व विष्णू सहस्र नाम स्तोत्राची संहिता शिकवली जाते. ह्या स्तोत्रांचे सामूहिक पठण व व्यक्तिगत अनुष्ठान उपक्रम पण राबवले जातात. आजवर देशा विदेशातून अनेक सद्भक्तांनी दत्त बावन्नीचे ५२ पाठ ५२ गुरुवारी म्हणायचा संकल्प घेतला आहे. कित्येक ठिकाणी महिन्यातील एका रविवारी सामूहिक दत्त बावन्नी पठण, विष्णू सहस्र नाम पठण केले जाते.
दत्त बावन्नी विषयीच्या शंका व समाधान येथे क्लिक करा
आदिवासी वस्तीत-आदिवासी पाड्यात जाऊन तिथल्या लोकांचे धर्मांतर होऊ नये म्हणून कीर्तन-प्रवचन-प्रभात फेरी ह्या माध्यमातून "धर्म जागरण" करणे. तिथल्या लोकांचे शैक्षणिक प्रश्न-आरोग्याचे प्रश्न ह्या विषयी सेवा कार्य करणे हां "धर्म जागरण" उपक्रम चालू आहे. सर्वांनी ह्यात सहभागी व्हावे ही नम्र प्रार्थना.
महत्वाची सूचना: वार्षिक तीर्थयात्रा / गिरनार परिक्रमा / वारी व इतर सर्व उपक्रम कोणत्याही व्यावसायिक कार्य हेतूने न करता केवळ सेवा भावनेने व सर्व भक्तांच्या सामुहिक सहकार्याने राबविले जातात.
अधिक माहितीसाठी