वैशाख व.द्वितीया म्हणजे देवर्षी नारदांचा जयंती उत्सव होय...नारदीय कीर्तन परंपरेतील सर्व कीर्तनकार-प्रवचनकार बंधू-भगिनी एकत्र येऊन गेल्या तीन/चार वर्षांपासून "नारद जयंती" मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत...!!! पनवेल-त्र्यंबकेश्वर-खोपोली ह्या नंतर ह्या वर्षीची "देवर्षी नारद जयंती" १९ मे २०१९ रोजी पुणे येथे साजरी होणार आहे...पुण्यातील सुप्रसिद्ध नारद मंदिरात जवळ जवळ २५०/३०० नारदीय कीर्तनकार बंधू-भगिनी एकत्र येऊन हां जयंती उत्सव साजरा करणार आहेत...!!! "आद्य कीर्तनकाराय नारदाय नमो नम: " ह्या न्यायाने vivekbuwagokhale.com ह्या वेबसाईटच्या वतीने देवर्षी नारद यांच्या चरणीं सविनय दंडवत प्रणाम व देवर्षी नारद जयंतीस उपस्थित राहणाऱ्या सर्व कीर्तनकार बंधू-भगिनींना प्रेमपूर्वक नमस्कार...!!! नारायण...