ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार, कीर्तन प्रशिक्षक आ. ह.भ.प.श्रीधर बुवां भागवत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार, कीर्तन प्रशिक्षक आ. ह.भ.प.श्रीधर बुवां भागवत (अंधेरी) यांचे २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुःखद निधन झाले. कै.आ.भागवत गुरुजींनी दादर येथील अ.भा.कीर्तन संस्थेच्या माध्यमांतून अनेकानेक उत्तम कीर्तनकार घडवले...!!!

एक उत्तम संस्कृतज्ञ-एक उत्तम कीर्तन प्रशिक्षक-एक उत्तम व्यासंगी कीर्तनकार, तसेच आदर्श व चारित्र्यवान व्यक्तीच्या जाण्याने नारदीय कीर्तन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे...!!!

www.vivekbuwagokhale. com ह्या वेबसाईटच्या वतीने कै. आदरणीय ह.भ.प.श्रीधर बुवां भागवत (गुरुजी) यांना कृतज्ञता पूर्वक नमस्कार व सहृदय श्रद्धांजली...!!!

दत्त दत्त दत्त...